Previous Next
Download for
Laptop |
Tablet |
SmartPhone |
BasicPhone
This app works offline; all videos are included within the app.
गर्भधारणेच्या दरम्यान स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी महिलांना सूचना आणि गर्भधारणेच्या पूर्वी, दरम्यान आणि नंतर उत्तम काळजी घेण्याचे महत्व.
गर्भधारणेच्या दरम्यान प्रसुतीपूर्व काळजी घेण्याचा थेट संबंध ती माता आणि जन्माला येणाया बाळाचं आरोग्य आणि तब्येतीशी आहे.
संबंधित पालकांनी बाळाच्या जन्माबाबत माहिती कळताच लगेच आंगणवाडीला भेट द्यावी आणि माता आणि बाल सुरक्षा कार्ड घ्यावं, हे साधं पण अत्यंत उपयोगी कार्ड त्यांना त्यांच्या बाळाचं पोषण आणि वाढीवर सतत लक्ष ठेवण्यात मदत करेल.
भारतात 75 टक्के नवमाता अशक्त असतात आणि गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचं जितकं वजन वाढायला हवं त्यापेक्षा कमी वजनाच्या असतात. यामुळे गर्भाची वाढ नीट होत नाही, जन्माच्या वेळेस बाळाचं वजन कमी राहतं आणि जन्माच्या वेळी त्याला विकृती निर्माण होतात.
गर्भधारणेच्या दरम्यान, त्या मातेला योग्य त्या वेळी योग्य आहार मिळण्याची खात्री करा. तिला अधिक प्रमाणात अन्न, नेहमीपेक्षा एक-तृतियांश अधिक अन्न मिळालं पाहिजे.
गर्भवती मातेला दिवसा किमान दोन तास विश्रांती मिळाली पाहिजे. रात्रीच्या वेळी, तिने आठ तास झोप घेतली पाहिजे. तसंच, घरामध्ये आनंदी वातावरण ठेवलं पाहिजे.
या व्हिडीओचा उद्देश कुपोषणाची चिन्हं आणि धोकादायक परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आणि समुदायानं कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे आणि कुपोषण टाळण्यासाठी आपण करु शकाल असे सोपे उपाय यात समजावून सांगितले आहेत.
सर्वसाधारण लोकांसाठी हा व्हिडीओ आहे.
निर्मितीः महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, युनिसेफ आणि अन्य विकास भागिदारांच्या सक्रीय पाठिंब्याने.